लोकसत्‍ता टीम

अमरावती : बडनेरा रेल्‍वे स्‍थानकापासून जवळच असलेल्‍या एका हॉटेलनजीक २७ वर्षीय तरूणाची धारदार शस्‍त्राने वार करून हत्‍या करण्‍यात आली. ही हत्‍या मृत तरूणाच्‍या दोन मित्रांनीच केल्‍याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींच्‍या विरोधात हत्‍येचा गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Man arrested for emotionally manipulating and extorting ₹2.5 crore from girlfriend.
Crime News : फोटो, व्हिडिओ अन्… २० वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करत प्रियकारने उकळले २.५ कोटी रुपये
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष
Man arrested for stabbing youth with sickle over social media status Pune print news
समाज माध्यमातील ‘स्टेटस’वरुन तरुणावर कोयत्याने वार करणारे गजाआड

विक्रम पप्‍पू संगते (२७, रा. तिलकनगर, जुनी वस्‍ती, बडनेरा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात आयुष नरेश मेश्राम (रा. प्रभात कॉलनी, बडनेरा) आणि लौकेश वीरेंद्र चौधरी (रा. गांधीनगर, बडनेरा) या आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

आणखी वाचा-करोनाचे निदान झालेला रुग्ण नागपूरहून विमानाने…

मारेकरी आयुष आणि लौकेश हे विक्रमचे मित्र आहेत. एक महिन्‍यापुर्वी विक्रम आणि त्‍यांच्‍यात वाद झाला होता. हा वाद होण्‍यापुर्वी तिघेही सोबतच राहत होते. त्‍यांच्‍यात नंतर दुरावा निर्माण झाला होता. महिनाभरापुर्वी झालेल्‍या वादाचा वचपा काढण्‍यासाठी आरोपींनी विक्रमला बडनेरा रेल्‍वेस्‍थानका समोरील एका हॉटेल जवळ नेऊन त्‍याच्‍यावर चाकूने वार केले. या हल्‍ल्‍यात विक्रमचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्‍थळी पोहचले. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

Story img Loader