लोकसत्ता टीम

नागपूर: प्रेमात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने गळा आवळून खून केला. अनैतिक संबंधातून हत्याकांड घडल्याची घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. शुभम असे मृत मुलाचे नाव आहे. तर प्रवीण हिरोडकर असे आरोपीचे नाव आहे.

Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
mother and her boyfriend sentenced to life for murdering her child by drowning
मुलाचा खूनप्रकरणी, आईसह प्रियकरास जन्मठेप
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
Petrol theft suspect, Murder of youth Narhe area,
पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाचा खून करणारा माजी उपसरपंच गजाआड
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा विधवा आईसह गावात राहत होता. त्याची आई शेतात मजुरीला जायची तर शुभम ही शिक्षण घेत होता. शुभमच्या वडिलाचे निधन झालेले आहे. आरोपी प्रवीण हा शेतकरी असून तो अविवाहित आहे. त्याच्या शेतात ती महिला कामाला जात होती. यादरम्यान प्रवीणने त्या महिलेशी संबंध वाढवले. तिच्याशी मैत्री केली आणि तिला जाळ्यात ओढले. तिला मदत करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी सलगी करीत होती. शेवटी प्रवीणने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आणखी वाचा- महाविकास आघाडीच्या सभेत कोण-कोण बोलणार? अजित पवार म्हणाले…

त्यानंतर तो वारंवार तिला शेतमजूर म्हणून कामाला सांगून शेतात नेऊन तिच्याशी संबंध ठेवत होता. काही दिवसांतच महिलेचे आणि प्रवीणच्या प्रेमसंबंधाची चर्चा गावात सुरू झाली. शुभमच्या कानावर चर्चा आल्यानंतर त्याने आईची समजूत घातली. मात्र, आईने फक्त मैत्री असून शारीरिक संबंधाबाबतच्या चर्चेबाबत नकार दिला. एक दिवस शुभम घरी नसताना प्रवीण घरी आला. दोघेही घरात असतानाच शुभम घरी आला. त्यावेळी शुभमने प्रवीणला शिवीगाळ केली आणि आईलाही शिवीगाळ करीत मारहाण केली. आईचे प्रेमसंबंध असल्याची खात्री झाल्यामुळे तो वारंवार तिला प्रवीणशी संबंध तोडण्याची भाषा करीत होता. आईचा प्रियकर प्रवीणने शुभमला एकदा दमदाटी करीत प्रेमसंबंधात अडसर न ठरण्याची धमकी दिली होती.

गुरुवारी शुभमने आईला मारहाण करीत प्रवीणशी अनैतिक संबंधाला विरोध केला. ती रडत रडत घराबाहेर पडली. त्याचवेळी प्रवीण तिच्या घरी आला. त्याने शुभमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याचे बघून त्याने शुभमचा गळा आवळून खून केला. गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. त्यामुळे नरखेड पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आरोपी प्रवीणला अटक केली.

Story img Loader