लोकसत्ता टीम

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एका घरात मुलाने आजारी आईची हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. दुर्गा रतन मेश्राम (५०) रा. संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, राणी दुर्गावती चौक असे मृत महिलेचे तर अंकित (२५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. दुर्गा यांची प्रकृती काही काळापासून खालावली होती. अंकित हा पेटिंगची कामे करायचा. आईच्या आजारपणामुळे तो कंटाळला होता.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले

आणखी वाचा-गुजरातमधून खत आणून घरातून अनधिकृत विक्री; पुसदमध्ये १० लाखांच्या ८३० बॅग जप्त

गुरुवारी रात्री दुर्गा यांच्या गाल, गळ्याजवळ शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांना मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यावेळी मुलगा अंकित हादेखील तेथे होता. मात्र कुणालाही त्याच्यावर शंका आली नाही. प्रिया यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने त्याच्या जबानीमध्ये विसंगत माहिती दिली व त्यामुळे पोलिसांना संशय आला. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने त्याला दरडावून विचारले असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांना आरोपी अंकित म्हणाला, आई (दुर्गा) या बेडवरच असल्यामुळे जेवण, स्वच्छता, औषधपाणी त्यालाच करावे लागायचे. सोबतच त्याला धुणीभांडी, साफसफाई, कचरादेखील उचलावा लागायचा. यामुळे तो कंटाळला होता. त्यातूनच त्याने हत्या केली.