लोकसत्ता टीम

यवतमाळ : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याच्या नादात थेट दोन खून करणारा एक प्रेमवीर तब्बल दोन वर्षांनी पोलिसांच्या कचाट्यात सापडला आणि त्याला बेड्या पडल्या. एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावे, अशी घटना नेर येथे उघडकीस आली.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित प्रेयसीला आपली व्हावी यासाठी आरोपीने आधी तिच्या पतीचा खून करून तिला आपल्या गावात भाड्याने घर करून दिले. मात्र, तेथे घरमालकाच्या मुलाची प्रेयसीवर वाईट नजर आहे, या संशयातून प्रियकाराने दुसराही खून केला. लाडखेड पोलीस दोन वर्षांपासून या गुन्ह्याचा तपास करत होते. मात्र, गुन्हा उघड झाला नव्हता. अखेर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. संजय अमरसिंग आडे (३०) रा. नेर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आणखी वाचा-राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली हे सांगायला लावू नका? किशोरी पेडणेकर यांचा इशारा

२८ जानेवारी २०२२ रोजी घुई ते लासिना मार्गावर योगेश शालीक भेंडे, रा. हुनमाननगर, नेर, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. शवचिकित्सा अहवालातून या युवकाचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, हा खून कोणी व का केला याचा शोध लागत नव्हता. तीन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. मात्र, सुगावा मिळत नव्हता. दरम्यान, नेर शहरात एकाने प्रेयसीच्या नवऱ्याचा दोरीने गळा आवळून खून केला व त्यानंतर प्रेयसीसोबत लग्न केले, अशी चर्चा सुरू होती. प्रेयसीच्या नवऱ्याचा खून झाल्यानंतर चार महिन्यांनी योगेश भेंडे याचा खून झाला होता. त्यावेळी संबंधित आरोपीवर योगेश भेंडेचा खून केल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, ठोस पुरावा नसल्याने तपास रखडला होता. लाडखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वप्निल निराळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन नव्याने तपास सुरू केला. यात जुनाच संशयितच मुख्य आरोपी असल्याचे धागेदोरे गवसले. पोलिसांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी संशयित संजय अमरसिंग आडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच संजयने दोन्ही खून केल्याची कबुली दिली.

आणखी वाचा-शेतमाल निर्यातबंदी कायमची बंद करा, शेतकरी संघटना आग्रही

प्रेमात अडसर ठरत असल्याने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रेयसीसोबत लग्न केले. तिला नेर शहरातील हनुमाननगर भागात भाड्याने खोली करून दिली. त्यानंतर तेथे घरमालकाचा मुलगा येरझारा मारतोय म्हणून संशय आला. त्यामुळे त्याचाही दोरीने गळा आवळून खून केला. या दोन्ही गुन्ह्यांत आरोपी संजयने एकच पद्धत वापरली. कोणताही पुरावा मिळू नये, अशा पद्धतीने त्याने दोन्ही गुन्हे केले. दोन्ही खून गळा आवळून केल्याची कबुली आरोपी संजयने दिली. या तपासात सहायक निरीक्षक स्वप्निल निराळे, सहायक निरीक्षक अमोल पुरी, जमादार नासीर शेख, उमेश शर्मा, विठ्ठल कोपनर, अमित गायकी, शालीक वाघाये, विशाल भगत यांनी सहकार्य केले.