वर्धा : एकीकडे नूतन वर्ष सुरू होण्याच्या जल्लोष असतांनाच दहेगाव येथे रक्ताचा सडा सांडला. खरांगानालगत दहेगाव गोंडी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.विजय पांडुरंग मसराम व गजानन पांडुरंग मसराम या दोन भावात विविध कारणांनी भांडण होत होते.धाकटा विजय हा आईवडिलांसोबत गावात राहायचा.तर थोरला गजानन हा आजीकडे वास्तव्यास होता.
हेही वाचा >>> घाबरू नका,नागपूर जिल्हयात मुबलक पेट्रोल व गॅस साठा : जिल्हाधिकारी
घटनेच्या दिवशी रात्री दोघात कडाक्याचे भांडण झाले.वाद हाणामारी पर्यंत पोहचला.त्यात गजाननने विजयच्या डोक्यात काठीने प्रहार केला.रक्तबंबाळ झालेल्या विजयला खारांगणा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यास सेवाग्राम रुग्णालयात नेण्याचे ठरले.मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेने गावात खळबळ उडाली.अतिजलद कृती दल गावी पोहचले.पोलीसांनी आरोपी गजानन यास अटक केली आहे.