बुलढाणा : चार गुंठे तिही अतिक्रमित जमिनीच्या वादातून लहान भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू  झाला. याप्रकरणी आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहापायी माणूस कोणत्या थराला जातो, याचे प्रत्यय असलेल्या साखरखेर्डा येथील या घटनेने सिंदखेडराजा तालुका हादरला आहे. 

हेही वाचा >>> लाचखोर दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षकाला पोलीस कोठडी; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील फरार

father thrown his two dauthers in river in buldhana district
पोटच्या लेकींना पित्याने नदीत फेकले
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Rahul Gandhi Kolhapur
“वांग्याची, हरभऱ्याची भाजी बनवली, भाकऱ्या थापल्या”, राहुल गांधीनी कोल्हापुरात टेम्पोचालकाच्या घरात बनवला स्वयंपाक!
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड
caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
Kolhapur murder
कोल्हापूर: मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासू, सासऱ्याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंद
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा

साखरखेर्डा ते मेहकर मार्गावरील सांवगी टी-पॉईंटवर टाले बंधूंचे वडिलोपार्जित शेत असून त्याच शेतात ७ भावंडे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे.  त्यापैकी हरीराम, पांडुरंग आणि एकनाथ टाले हे तीन भाऊ त्याच ठिकाणी जय मल्हार ढाबा चालवितात. १९ एप्रिलच्या सकाळी देवीदास टाले व त्याची दोन मुले पवन आणि श्रीकृष्ण यांनी लहान भाऊ एकनाथ सीताराम टाले यास लोखंडी रॉड आणि फायटरने बेदम मारहाण केली. पांडुरंग आणि हरीराम टाले भांडण सोडविण्यास गेले असता देवीदास व त्याच्या मुलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मारहाणीत एकनाथ आणि हरीराम टाले हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकनाथ टाले यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.

हेही वाचा >>> वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला, बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील घटना

टाले यांच्या वडिलोपार्जित जमिनीची सातही भावांत समान वाटणी झालेली आहे. महालक्ष्मी तलावाला लागून काही अतिक्रमित जागा आहे. त्यातील ४ गुंठे जमीन ही देवीदास व त्याच्या मुलांना हवी होती. पांडुरंग, हरीराम व एकनाथ यांचा त्याला विरोध होता. याच रागातून देवीदासने आपल्या पवन व श्रीकृष्ण या मुलांच्या मदतीने आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढला. पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी नव्याने कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. यापूर्वी मारहाणप्रकरणी तिघा पिता-पुत्रांवर ३०७, ३२३, ३२४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी देवीदास सीताराम टाले, पवन देवीदास टाले आणि श्रीकृष्ण देवीदास टाले या तिघा पिता-पुत्रांना अटक करण्यात आली आहे.