लोकसत्ता टीम

नागपूर: पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिलेचे फेसबुकवरून एका युवकाशी सूत जुळले. त्या युवकाने प्रेयसीच्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार केला. मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सदर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. धीरज ताडे असे नराधम आरोपी प्रियकराचे नाव आहे.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हा बांधकाम कामगार आहे. त्याची २००० मध्ये एका ३० वर्षीय महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. दोघांचा संपर्क वाढला आणि सूत जुळले. त्यादरम्यान महिला पतीपासून विभक्त झाली. तिला १० व ८ वर्षांच्या दोन मुली होत्या. धीरजशी प्रेमसंबंध वाढल्यानंतर नागपुरात दोघांच्याही भेटी व्हायला लागल्या.

आणखी वाचा-नागपूर: संपत्तीसाठी पुतण्याच उठला जीवावर!; मित्रांसह घरात शिरला, चाकू काढला अन्…

अविवाहित असलेल्या धीरजने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याचे वचन दिले. त्यामुळे महिलेने माहेर सोडले आणि थेट धीरजसोबत राहायला गेली. काही दिवस धीरजने प्रेयसी व दोन्ही मुलींना व्यवस्थित ठेवले. मात्र, त्याला दारुचे व्यसन जडले. तो दारु पिऊन मोठ्या मुलीकडे वाईट नजरे बघायला लागला. तो प्रेयसीला घेऊन मुंबईला कामासाठी निघून गेला. वर्षभर तेथे हातमजुरी केल्यानंतर तो परत आला. गेल्या काही दिवसांपासून तो प्रेयसीच्या १० वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करीत होता. रात्री सर्व जण झोपल्यानंतर तो तिच्याशी लैंगिक चाळे करीत होता. कुणालाही सांगितल्यास घरातून बाहेर काढून देण्याची धमकी देत होता. त्यामुळे आईच्या प्रियकराचा अत्याचार ती मुलगी सहन करीत होती.

शुक्रवारी मुलीची आई कामाला बाहेर गेली होती तर दोघ्या बहिणी घरी होत्या. दुपारी धीरजने १० वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधासाठी बळजबरी केली. मात्र, मुलीने त्याला विरोध दर्शविला. मात्र, धीरजने मुलीवर दयामाया न दाखवता बलात्कार केला आणि तिला धमकी दिली. सायंकाळी तिने आईकडे पोटात दुखत असल्याची तक्रार केली. तिची आस्थेने विचारपूस केली असता तिने धीरजने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. हा प्रकार ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेच सदर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Story img Loader