नागपूर : मागील वर्षभरापासून रेल्वेचे विकास कामे सुरू आहे. कंत्राटदाराकडून काही कामगार गेल्या आठ महिन्यांपासून अजनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर सात जवळ झोपडीत राहत आहेत. यातील पीडित तरुणी ही आई वडिलांसह राहते. तर आरोपी धीरज कुमार हा सुध्दा कामगार असून जवळपास राहत होता.
ते प्लॅटफार्मच्या बांधकामावर काम करीत होते. कामानिमित्त दररोज भेट व्हायची. यातूनच दोघांचीही मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपी धीरज कुमारने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. धीरज कुमार संधी मिळताच अजनीच्या रेल्वे पुलाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.ट
हेही वाचा…आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
नंतर ईतवारी रेल्वे स्थानकावर विकास काम सुरू झाल्याने कामगारांना तेथे पाठविण्यात आले. त्याठिकाणी सुध्दा धीरज कुमार तरुणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दरम्यान मुलीच्या शरीरातील बदल बघून आई वडिल तिला रूग्णालयात घेऊन गेले. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या आई वडिलांनी विचारपूस केली असता धीरज कुमारचे नाव पुढे आले. त्यांनी आरोपीला बोलाविले. लग्न करण्यासाठी विनवणी केली. मात्र, लग्नाचे नाव ऐकताच तो पळाला. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत होता.
तरुणीच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला. पोलीस पथकाने त्याचे ‘लोकेशन’ काढले असता तो वरूडला असल्याचे समजले. पोलिसांनी वरूडहून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक गावंडे यांच्या नेतृत्वात मजहर अली, पप्पू मिश्रा यांनी केली.
हेही वाचा…महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…
एका कामगार तरुणीला रेल्वेच्या पुलाखाली नेऊन युवकाने बलात्कार केला. ती पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर युवकाने तिला ओळखण्यास नकार दिला. ही गंभीर घटना अजनी रेल्वेस्थानक परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. धीरज कुमार (२२) रा. बिहार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गर्भवती असलेल्या पीडितेने त्याला लग्नासाठी विनवणी केली असता तो पळाला. मात्र, पोलिसांनी त्याला अमरावतीच्या वरूड येथून अटक केली.
बिहारला पळून जाण्याची तयारी
आरोपी धीरज कुमार याच्यावर प्रेयसी बलात्काराचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळाली़ त्यामुळे तो छट पूजेच्या नावाखाली नागपुरातून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने छटपूजा झाल्यानंतर लग्न करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, तरुणीने गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करीत त्याला धडा शिकवला. तरुणीच्या पोटात असलेल्या बाळाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसून प्रियकराच्या अटकेनंतर संभ्रम निर्माण झाला आहे.