प्रेयसीसमोर मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी तरुणीच्या प्रियकराने तिच्या पहिल्या प्रियकराच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना नागपुरातील पारडी परिसरात घडली. मोहम्मद इमरान शेख ऊर्फ सोनू शेख ईसाक (२७, पारडी) असे आरोपी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलील (गौरीनगर) यांचा साळा अन्वर (२६) याचे वर्षभरापूर्वी एका दुचाकीच्या शोरूममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करते.
हेही वाचा >>> अमरावती : पुणेकर जावयाने सासऱ्याला दीड कोटींनी गंडविले
तिच्यासोबत अन्वरचे वर्षभर प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध होता. यादरम्यान, त्या युवतीचे इमरान शेख याच्यासोबत सूत जुळले. ती दोघांवरही प्रेम करीत होती. मात्र, तिच्या चलाखीपासून दोन्ही प्रियकर अनभिज्ञ होते. काही दिवसांपूर्वी इमरानच्या दुचाकीवर ती तरूणी फिरताना दिसली. त्यामुळे अन्वरचे डोके भडकले. त्याने इमरानचा पाठलाग केला. प्रेयसी आणि इमरान शेखला त्यांनी घरी नेले. तेथे इमरानला जलील आणि अन्वर यांनी मारहाण केली. तसेच प्रेयसीसमोरच अपमान करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा >>> नागपूर : लैंगिक हेतूशिवाय स्पर्श करणे गैरवर्तन नाही ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण
एकटा असलेला इमरान तेथून प्रेयसीला सोबत घेऊन निघून गेला. तरुणीने अन्वरऐवजी इमरानची निवड करीत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे इमरानला प्रेयसीसमोर मारहाण केल्याचा बदला घ्यायचा होता. त्याने १३ मार्चच्या रात्री अकरा वाजता अन्वरच्या बहिणीचा पती जलील याला इमरान आणि मो. अयाज शेख यांनी रस्त्यात अडविले. जलीलवर दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्याची दोन्ही मुले बचावासाठी धावली. त्यांच्यावरही इमरानने चाकू हल्ला करीत गंभीर जखमी केले. नागरिकांनी धावाधाव केल्यामुळे त्याचा जीव वाचला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.