नागपूर : ‘मुली असून तुम्ही चौकात सार्वजनिकरित्या सिगारेट ओढता, तुम्हाला लाज वाटायला हवी,’ असा सल्ला युवकाने दोन तरुणींना दिला. त्या तरुणींनी आपल्या मित्राला बोलावून त्या युवकाचा खून केला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. रंजीत बाबुलाल राठोड (२६, ज्ञानेश्वरनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात दोन तरुणींसह तिघांना अटक करण्यात आली.

रंजीत राठोड हा गल्लोगल्ली जाऊन साडी विक्रीचा व्यवसाय करतो. तो पत्नी व तीन मुलांसह ज्ञानेश्वरनगरात राहतो. तो शनिवारी रात्री अकरा वाजता जेवन करून फिरायला बाहेर पडला होता. त्यावेळी जयश्री पानझाडे (२४, वाडी) आणि सविता सायरे (२३) या दोन तरुणी महालक्ष्मी नंबर एक, बाकडे सभागृहाजवळ सिगारेटचे झुरके घेत उभ्या होत्या. तेथून रंजीत जात असताना त्याला दोन्ही तरुणी दिसल्या. त्याने दोन्ही तरुणींना सिगारेट न पिण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोन्ही तरुणींना त्याचा राग आला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला

हेही वाचा…ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

जयश्रीने तिचा मित्र आकाश गणेश राऊत (हसनबाग) याला फोन केला आणि तेथे बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनीही त्याला जबर मारहाण केली. त्याला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन माफी मागण्यास भाग पाडले. त्याने माफी मागण्यास नकार दिल्यामुळे जयश्री आणि सविता यांनी रंजितचे हात पकडले तर आकाशने चाकूने सपासपा वार करून खून केला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी रंजितचा जावई शंकर रॉय यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली.

हेही वाचा…साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी ताब्यात

रंजीतचा मृतदेह एका वाटसरुला दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना कोणताही सुगावा मिळाला नाही. त्यामुळे एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये जयश्री पानझाडे आणि सविता सायरे दिसून आल्या. त्यानंतर आकाश राऊतसुद्धा चाकू घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी रविवारी रात्री आठ वाजता तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Story img Loader