पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस, अशी विचारणा करून एका तरूणाची कोयत्याने वार करून हत्‍या करण्‍यात आल्‍याची घटना नांदगाव खंडेश्‍वर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत उघडकीस आली आहे. नांदगाव खंडेश्वर ते मोखड मार्गावरील मालानी गिट्टी खदानच्या प्रवेशद्वारा जवळ आकाश गजानन सहारे (२५, रा. सावनेर) याचा मृतदेह शनिवारी आढळून आला होता. गजाननची हत्‍या  करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> वाशीम : फडणवीस आणि ठाकरेंनी एकत्र यावे, महंत कबीरदास महाराज यांची इच्छा

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी मृत गजाननचा भाऊ महादेव सहारे (३१, रा.सावनेर) याच्या तक्रारीवरून अंकुश दामोदर हंबर्डे (३३, सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुद्ध हत्‍येचा गुन्हा दाखल केला. अवघ्या काही तासात खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी अंकुश हंबर्डे याला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तू माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो, अशी विचारणा केल्‍यानंतर झालेल्या वादातून अंकुशने आपल्या भावाला कोयत्याने मारून जिवानिशी ठार केल्याची तक्रार मृताचा भाऊ महादेवने नोंदविली. शनिवारी दुपारी आकाशचा मृतदेह चार किमी अंतरावरील खदानीसमोर आढळून आला होता. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पंचनामा करत तातडीने मृताची ओळख पटविली. यापूर्वी देखील आकाश सहारे व अंकुश हंबर्डे यांच्यात वाद झाला होता, असे तपासादरम्यान उघड झाले आहे.

Story img Loader