लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार नियतक्षेत्रात सोमवारी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास घडली. श्रीकृष्णा सदाशिव कोठेवार (५१) असे मृताचे नाव आहे.

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) येथील श्रीकृष्णा कोठेवार हे सोमवारी सकाळी सरपण आणण्यासाठी कच्चेपार येथील कक्ष क्रमांक २५४ परिसरात गेले होते. परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने कोठेवार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरात सरपण गोळा करीत असलेल्या नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सोबत पोलीस निरीक्षक तुषार चौव्हाणही आपल्या पथकासह पोहोचले. पंचनामा केल्यानंतर कोठेवार यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

आणखी वाचा-मेडिकलमधील रोबोटिक्स यंत्र खरेदी वादात, उच्च न्यायालयात याचिका

श्रीकृष्णा कोठेवार यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून तातडीने २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. घटनास्थळी वनविभागाने ‘कॅमेरे’ लावले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी दिली. नागरिकांनी क्षुल्लक कारणासाठी जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.