नागपूर : “गडकरीजी.. मै आपकी बहोत बडी ‘फॅन’ हु, शायद ही मेरे जितनी बडी ‘फॅन’ आपकी कोई नही होगी” माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. “पाॅलिटीशियन विथ नो हेटर्स” म्हणजेच कोणताही द्वेष नसलेला राजकारणी असे तुमचे वलय आहे आणि म्हणूनच मी तुमची जगातील सर्वात मोठी ‘फॅन’ असल्याचे त्या गडकरींना म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा येथे एका कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी गेले होते. यावेळी त्यांनी पीपल्स फॉर एनिमल्स या संस्थेच्या करुणाश्रम या संस्थेला भेट दिली. सायंकाळी पावणे सात वाजता ते आश्रमात येणार होते पण नियोजित वेळेपूर्वी ६.१५ वाजताच त्यांचे आश्रमात आगमन झाले. येथे आल्यानंतर त्यांनी आशिष गोस्वामी यांच्याकडून आश्रमाबाबतची प्राथमिक माहिती घेतली.

हेही वाचा : यवतमाळ: मृत्यूच्या दाखल्यासाठी पैशांची मागणी, स्टिंग ऑपरेशननंतर लिपिक निलंबित

येथे आणल्या जाणाऱ्या प्राण्यांचे संगोपन कशा प्रकारे होते व त्यांच्यावर कसे उपचार केले जातात याबाबत विविध प्रश्न त्यांनी उपस्थित करून उत्तरे मिळविली. प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती डॉक्टर संदीप जोगे यांनी दिली. आश्रमातील वन्यजीव विभाग, गोशाळा, आरोग्य विभाग, आदी फिरून प्रत्येक विभागाची माहिती जाणून घेतली. विभाग प्रमुख (वन्यजीव) कौस्तुभ गावंडे यांचे कडून रेस्क्यू करण्यात आलेल्या “दुर्गा” या वाघिणी बाबतची व करुणाश्रमात वास्तव्याला असलेल्या वन्यप्राण्यांच्या बाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. करुणाश्रमासारखे मुक्या प्राण्यांकरिता कार्य मी कुठेच पाहिले नाही’ असे यावेळी गडकरी म्हणाले.

मुक्या प्राण्यां करिता अतिसंवेदनशील पणे होणारे कार्य मला करुणाश्रमात आज पाहता आले, असे कार्य मी इतर कोठेही पाहिलेले नाही. मुक्या प्राण्यांकरीता संवेदनशीलपने काम करणे सोपे नाही, येथे ती संवेदनशिलपना जपली जाते याचा मला आज अती आनंद झाला, असे सांगत करुणाश्रमाच्या व्यवस्थापनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शाबासकीची थाप दिली. करुणाश्रमात असलेल्या विविध प्राण्यांबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मनेका गांधी यांना फोन लावला. वर्धा करुणाश्रमाला भेट देऊन पाहणी केल्याचे सांगत येथील कार्याची भरभरून स्तुती केली व आवश्यक ते सर्व सहकार्य या प्रकल्पाला देण्यात येईल असे आश्वासन देत येथील कार्याबाबत आनंद व्यक्त केला. एवढेच नाही तर मंगळवारी दिल्लीत आल्यानंतर मनेका गांधी यांना भेटण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.

हेही वाचा : “मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली, लहान माणसांनी यावर बोलू नये”, काय म्हणाले नाना पटोले?

फोनवर गडकरी आणि मनेका गांधी यांच्यात बराच वेळ संवाद रंगला. करुणाश्रमात गडकरी यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाचे ठेंगडी, सहाय्यक उपवनसंरक्षक तलहन, डॉक्टर संदीप जोगे व पगडाल यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. आश्रमात असलेल्या गोशाळेतील एका गाईचे पूजन करून गो सेवेच्या कार्याबाबत आनंद व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आ पंकज भोयर, माजी पोलीस अधीक्षक नुरूल हसन, पीपल्स फॉर एनिमल्सचे सचिव आशिष गोस्वामी, वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे व वन विभागाचे अधिकारी होते तसेच ऋषिकेश गोडसे, दर्शन दुधाने, देवर्षी बोबडे, महेश गिरपुंजे,शुभम बोबडे डॉ रोहित थोटे, मंगेश येनूरकर यांचे सहकार्य लाभले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maneka gandhi calls nitin gadkari politician with no haters says biggest fan of gadkari rgc 76 css