लोकसत्ता टीम
वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या देशवासीयांना संबोधनाऱ्या उपक्रमाचा आज शंभरावा भाग सकाळी अकरा वाजता प्रक्षेपित होत आहे.
हा भाग वाजतगाजत साजरा करावा म्हणून भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नध्दा यांनी सूचना केल्या होत्या. शनिवारी पक्षाचे संजय फांजे यांनी काही अन्य सूचना केल्या आहेत. हा कार्यक्रम प्रसारित होत असताना नमो किंवा सरल ऍप वर कार्यक्रमाचे अधिकाधिक फोटो अपलोड करण्याची सूचना आहे. कार्यक्रमानंतर त्वरित जिल्ह्याची व विधानसभा क्षेत्राची कार्यक्रम माहिती फोटोंसह प्रदेश कार्यालयास व्हॉट्स ऍप करण्याचे निर्देश फंजे यांनी दिले आहेत.
आणखी वाचा-विश्लेषण : ‘मन की बात’चे शतक : जगभरातील नेत्यांच्या जनसंवादाच्या कुळकथा काय आहेत?
आमदार डॉ.पंकज भोयर हे सिंधी मेघे येथील एका शैक्षणिक संस्थेत पाचशे विद्यार्थ्यांसोबत बसून तर खासदार रामदास तडस हे देवलीत आय टी आय केंद्रात उपस्थित राहणार आहे.