नागपूर: मराठा आरक्षणवरून राज्यात आंदोलन सुरू असताना मंगळवारी सकाळपासून उपराजधानी नागपुरात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणा देत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजाचे पदाधिकारी प्रकाश खडांगे म्हणाले की, आमचे साखळी उपोषण राहणार असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

हेही वाचा… विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र थंड; मुंबई व कोकण विभागात तापमानात वाढ

जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याच्या वेळ दिला होता. त्यामुळे आता वेळ देऊनही सरकार काही करणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात विक्रम वाघ, प्रकाश खडांगे आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patils hunger strike a hunger strike by the entire maratha community near the statue of shivaji maharaj in nagpur vmb 67 dvr
Show comments