नागपूरमध्ये सध्या अग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात विविध कृषी विषयांवर परिसंवाद , चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना चार पैसे अधिक कसे मिळतील याचा ध्यास घेतलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा या प्रदर्शनात सक्रिय सहभाग आहे. एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी शेतमालापासून तयार वस्तूंना बाजारपेठ मिळवण्यासााठी जी कल्पना व उदाहरण दिले ते भन्नाटच होते.
हेही वाचा >>>ठरलं, नागपुरात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट; दीक्षाभूमी, शांतीवन, ड्रॅगन पॅलेस आणि…
काय म्हणाले गडकरी
शेतकऱ्यांनी पिकवेला माल नुसता चांगला असून चालत नाही तर त्यांचे उत्कृष्ट मार्केटिंग, पॅकेजिंग करता आले पाहिजे. हे एक तंत्र आहे. आम्ही साखरेपासून साबन तयार केले. त्याला भारतापेक्षा विदेशात अधिक मागणी आहे. हळूहळू येथेही मागणी वाढत आहे. पण त्याची जाहिरात आवश्यक आहे. . ‘ जोपर्यंत एखादी श्रीदेवी सांगत नाही की हे साबण चांगले आहे. तो पर्यंत गल्लीतील श्रीदेवी ते वापरत नाही” त्यामुळे उत्पादन चांगल असून चालत नाही तर ते चांगल दिसण आवश्यक आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करायला शिकावे.असे गडकरी म्हणाले.