लोकसत्ता टीम
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची हत्या झाली. त्यापूर्वी तिचे लैंगिक शोषण झाल्याचे आणि त्यासंदर्भातील चित्रफित पोलिसांनी आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सना खान प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आता या प्रकरणाशी नागपुरातील भाजपच्या अनेक मोठ्या नेत्याचा समावेश असल्याने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केंद्र व राज्य सरकारने चौकशी करावी. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी वृत्त वाहिनींच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
आणखी वाचा-राज्यातील पहिले दंत परिवेक्षण शास्त्रचे ‘सेंटर फॉर एक्सलेंस’ नागपुरात
या प्रकरणात आधी भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये असलेले मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांना नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, या प्रकरणात काँग्रसचे जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी उघडपणे तर भाजपच्या नेत्यांना गुपचुप बोलवले जात आहे. या प्रकरणात राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित अनेक नावे आहेत. भाजपच्याच अनेक मोठ्या नेत्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला.