नागपूर: भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ४६४४ पदांसाठी अकरा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र, २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उघड केले होते. त्यामुळे आता होणाऱ्या तलाठी भरतीमध्येही भ्रष्टाचार करून नोकरी मिळवण्याची अनेकांची आशा बळावली आहे.
याचा परिणाम असा की, तलाठी भरतीसाठी काही ‘सेटींग’ होणार का? अशी विचारणा अनेक उमेदवार करत आहेत. याशिवाय सध्या पदभरतीच्या बाजारात तलाठी भरतीसाठी १९ लाख रुपये दर सुरू असल्याची चर्चाही रंगली आहे. तलाठी भरती ही टीसीएस कंपनीकडून होणार असून शासनाने पदभरतीसाठी कठोर पावले उचलली आहेत.
हेही वाचा… नागपूर: पत्नीवर संशय, मुले माझे नाहीत म्हणून दोन्ही मुलांना विहिरीत ढकलले; न्यायालयाने आरोपीला….
सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाय योजले आहेत. त्यामुळे यंदा गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र, काही हौसी उमेदवारांकडून कायम तलाठी भरतीमध्ये १९ लाखांचा दर सुरू असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.