वर्धा : विधानसभा निवडणुकीत अनेक आपली हौस उभे राहून भागवून घेत असल्याचे अपक्ष उमेदवारांच्या संख्येमुळे म्हटल्या जाते. पण काही चेहरे मात्र छाप सोडून जातात. पक्षाने तिकीट दिली नाही तरी मी मागे हटणार नाही, असे ठरवित ते निवडणुकीस सामोरे जातात. यात काही उमेदवार लोकांना उद्याचे उमेदवार देखील वाटतात. त्यापैकी एक म्हणजे वर्धा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभे डॉ. सचिन पावडे हे होत. काँग्रेसने तिकीट नाकारली म्हणून स्वस्थ नं बसता सहकारी, मित्र, शिक्षित वर्गाचा कानोसा घेत त्यांनी रिंगणात उडी घेतलीच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्थिक उणीव नव्हतीच. होती ती वेळेवर जुळलेल्या लोकांना ओळखण्याची. मात्र वर्ध्यात तिहेरी फाईट आहे, एव्हडे लिहण्यास ते बाध्य करणारे ठरले, हे निश्चित. वर्धेच्या राजकारणाचा उद्याचा चेहरा, हा निर्माण विश्वास हेच त्यांचे साध्य. त्यांनी पण काँग्रेसचा झेंडा कायमचा हे पुढे पटवून देण्याची गरज आहे.हिंगणघाट येथून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे उमेदवार अतुल वांदिले यांनी पक्षात येऊन मोठी मजल मारली, असे त्यांनी तिकीट आणताच म्हटल्या गेले. हा कोण, असे विचारत पक्षातील ढूद्धाचार्यांनी नाराजी नोंदविली. बंडखोरी पण केली.

हेही वाचा…गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर एसटी उलटली… बसमधून आठ मृतदेह बाहेर काढले…

पण त्याची तमा नं बाळगता एकहाती वांदिले यांनी अस्तित्व दाखवून दिले. समोर समीर कुणावार यांच्यासारखा संघटन, आर्थिक, विकास कामे याची ताकद ठेवून असणाऱ्या उमेदवारपुढे यापैकी काहीच नसणारा हा युवा चेहरा जिल्ह्याचे उद्याचे नेतृत्व म्हणून मान्य पावले आहे. त्यांना प्राप्त मतांमुळे.देवळीत किरण ठाकरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण पुरेशी मते घेत त्यांनी देवळीचा उद्याचा चेहरा म्हणून या निवडणुकीत मान्यता मिळवून घेतली, अशी चर्चा होते. आर्वी मतदारसंघात काँग्रेस तिकीट मिळवून देण्याची व आमदार करण्याची हमी खासदार अमर काळे यांनी दिली पण ते फिरले असे जाहिर बोलत खळबळ उडवून देणारे बाळा जगताप हे पण निवडणुकीत अस्तित्व दाखवून गेले. थेट आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावर बहिष्कार टाकून देत त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचे म्हटल्या जाते. इथेच जय बेलखोडे यांची अपक्ष म्हणून लागलेली व कारंजा येथे आघाडीच्या मयुरा काळे यांच्यापेक्षा अधिक मते घेत केलेली कामगिरी चर्चेत आहे. या खेरीज सुधीर पांगुळ, डॉ. उदय मेघे, समीर देशमुख, विशाल रामटेके असे काही नावे निवडणुकीत दाखलपात्र ठरले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many independent candidates are standing in assembly elections to fulfill their passion pmd 64 sud 02