लोकसत्ता टीम
चंद्रपूर : आठ दिवसानंतर पावसाने सोमवारी विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग पूरामुळे बंद आहेत. तर जांभुळघाट-पिंपळगाव रस्त्याच्या पुलावरून पाणी असल्याने चार चाकी वाहान गेली वाहून गेली. यात पाच जण थोडक्यात बचावले.
या जिल्ह्यात २० जुलै पासून पावसाची रिपरिप सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. बहुसंख्य नाले दुथडी भरून वाहत आहेत. बल्लारपूर तालुक्यातील चारवट – माना मार्गावरून पाणी वाहत असल्याने इरई नदीवरचा पूल वाहतुकीकरिता बंद केला आहे.
आणखी वाचा-३३ टक्के आरक्षणासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यां रस्त्यावर
पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पाण्यामुळे पूल पाण्याखाली गेल्याने देवाडा पोंभूर्णा – वेळवा मार्ग बंद आहे. तर चिंचोली अंतरगांव मार्ग देखील बंद झाला आहे. वैनगंगा, वर्धा, इरई, झरपट, पैनगंगा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहे. अनेक गावांना अजूनही पुराचा धोका आहे. तर चिमूर तालूक्यातील जांभुळघाट ते पिंपळगाव रस्त्या वरील पुलावरून रविवार २८ जुलै २०२४ ला सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान कार वाहून गेल्याची घटना घडली.जिल्हात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली असून नदी व नाल्यांना पुर आला आहे.
पुलावरून पाणी वाहात असतांनाही बेजबाबदारपणे कार चालक आपली वाहाने टाकून जीव थोक्यात घालत आहेत.असाच पकार चिमूर जवळील पिंपळगाव याठिकाणी घडला कार घेऊन पिंपळगाव ईथुन नागपुर ला निगाले असता पुलावरून पाणी वाहत होते तरी सुध्दा भीती न बाळगता चार चाकी वाहन टाकण्यात आली.परंतु पाण्याच्या वेग जास्त असल्याने वाहन पुलाखाली खेचल्या गेली व वाहन वाहून गेले अशातच एका झाडाला हि कार अडकल्याने वाहणात असलेले प्रवासी वाहानाचे काच फोडून बाहेर निघाले आणि सुदैवाने पाच जण बचावले.
आणखी वाचा-सोन्याच्या दरात वारंवार बदल, हे दर बघून ग्राहक चिंचेत…
इरईचे सात दरवाजे उघडले
इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे.त्यामुळे इरई नदीचे पात्रात सर्वत्र पाणीच पाणी आहे.
‘ओला दुष्काळ जाहीर करा’
अतिवृष्टीमुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतमाल पाण्याखाली आले तर शेतकऱ्यांचे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले तर काही पिक माती खाली दबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.