लोकसत्ता टीम

अकोला : रेल्वेचे तांत्रिक कार्य मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. नागपूर विभागातील चांदूर रेल्वे आणि भुसावळ विभागातील वाघळी स्थानकावर ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्यामुळे अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळेत बदल आहे.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

नागपूर विभागातील चांदुर रेल्वे स्थानक येथे अप लूप लाईनच्या विस्तार कार्यासाठी ‘पॉवर’ आणि ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आला आहे. ‘नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक’ कार्यामुळे प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक १११२१ भुसावळ – वर्धा मेमू १२ ऑगस्ट रोजी रद्द, १११२२ वर्धा – भुसावळ मेमू १३ ऑगस्टला रद्द, गाडी क्रमांक १२११९ अमरावती – अजनी एक्सप्रेस व गाडी क्रमांक १२१२० अजनी – अमरावती एक्सप्रेस १३ ऑगस्ट रद्द, गाडी क्रमांक ०१३७१ अमरावती – वर्धा मेमू १३ ऑगस्ट रोजी रद्द, ०१३७२ वर्धा – अमरावती मेमू १४ ऑगस्ट व गाडी क्रमांक ०१३७४ अमरावती – वर्धा मेमू १४ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.

आणखी वाचा-एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् ८२ प्रवाशांचे वाचले प्राण…

भुसावळ विभागातील वाघळी स्थानक येथे मनमाड -जळगांव तिसरी मार्गिकासाठी ‘यार्ड रिमोडूलिंग’साठी ‘नॉन कार्य इंटरलॉकिंग’ करण्यात येत आहेत. या कार्यामुळे प्रवासी गाड्यामध्ये १२ ऑगस्ट रोजी बदल करण्यात आला आहे. २२१२२ लखनौ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ०१ तास १५ मिनिटे, १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ४० मिनिटे, ०५२९० पुणे – मुजफ्फरपुर विशेष दोन तास, १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हरिद्वार एक्सप्रेस ०१ तास ४५ मिनिटे, १४३१३ लोकमान्य टिळक टर्मिनस – बरेली एक्सप्रेस ०१ तास ३० मिनिटे, २२६९० यशवंतपूर -अहमदाबाद एक्सप्रेस एक तास व १२५३४ मुंबई -लखनउ पुष्पक एक्सप्रेस एक तासाने नियमित करण्यात येणार आहे. म्हणजेच तेवढा वेळेने संबंधित गाडी उशिराने धावेल. वेळेत गाडी स्थानकावर पोहोचली तरी ती थांबवून ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक कार्य केले जात आहे. त्यामुळे या महिन्यांत विविध गाड्यांच्या फेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्या, काही गाड्यांच्या वेळेत, स्थानकात किंवा मार्गात बदल करण्यात आले. रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मुळे प्रवाशांना चांगलाच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

Story img Loader