वाशिम: अनेक कुटुंब दारुमुळे उद्ध्वस्त होत आहेत. याची सर्वाधिक झळ घरातील, महिला मुलांना सोसावी लागते. गावागावात राजरोसपने अवैध दारु विक्री होत आहे. याविरोधात महिलांकडून अनेकदा पोलिसांना निवेदने, तक्रारी झाल्या. धरणे झाली, ग्रामपंचायतीनी ठराव घेतले गेले, तरीही जिल्ह्यात सर्रास अवैध दारु विक्री होत असून कारवाई होत नसल्याने महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर जिल्ह्यातील विचारवंत, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच तसेच विविध क्षेत्रातील नामवंतानी धरणे आंदोलन करून जिल्ह्यातील अवैध दारुविक्री बंद करावी, व्यसनमुक्ती कृती समिती गठीत करावी यासाह अनेक महत्वपूर्ण मागण्या केल्या. यापूर्वी अनेक ठिकाणी महिलांनी पोलीस विभागाना तक्रारी देखील केल्या व नुकताच वाशिम तालुक्यातील अडोळी ग्रामपंचायतने दारु बंदीचा ठराव घेतला. तरीही जिल्ह्यातील अनेक भागात अवैध दारु विक्री सुरूच आहे. यामध्ये आता नवे युवकही भरडला जात आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण

हेही वाचा… धक्कादायक! पैशासाठी जन्मदात्यांनीच पोटच्या पोरीला देहव्यापारात ढकलले; आई-वडिलांसह ६ जणांविरोधात गुन्हा

दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. मात्र अवैध दारु विक्रेत्यावर काही काळ कारवाईचा बडगा उगारला जातो नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री कायमची बंद करावी, यासाठी जिल्ह्यात दारु मुक्ती आंदोलन हाती घेण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले असून पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.