लोकसत्ता टीम
बुलढाणा: जालना जिल्ह्यातील आंदोलक मराठा समाज बांधवावर झालेल्या अमानुष लाठीमाराचे मोताळा नगरीत तीव्र पडसाद उमटले! आज शनिवारी दुपारी सकल मराठा समाजातर्फे मोताळ्यात रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलकांनी मलकापूर बुलढाणा राज्य मार्गावर ठिय्या दिल्याने वाहतूक खोळंबली. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अमानवी लाठीमार ची नैतिक जवाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.