बुलढाणा : मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या जालना जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद मलकापुरातही उमटले. सकल मराठा समाज बांधवांनी तहसील चौकात ठिय्या आंदोलन केले. एक मराठा लाख मराठा या गगनभेदी घोषणेने परिसर दणाणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यामुळे वाहतूक खोळंबली होती. लाठीचार्जची चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी अमानुष लाठीमाराचा तीव्र निषेध केला. हा लाठीमार म्हणजे मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन चिरडण्याचा कुटील प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.