बुलढाणा : आज १३ सप्टेंबरला सकल मराठा क्रांतीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी तेरा तालुक्यातून येणाऱ्या बांधवांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय घोषणांसह अनुषंगिक आचारसंहिता ठरविण्यात आली आहे.

यंदाच्या मोर्च्यात गगनभेदी घोषणा देण्यात येणार आहे. समन्वय समितीने मोर्चासाठीच्या घोषणा निर्धारित केल्या आहेत. एक मराठा लाख मराठा या बहुचर्चित घोषणेला यंदा ‘जय जिजाऊ, ‘जय शिवराय’ या मुख्य घोषणेची जोड राहणार आहे. याशिवाय ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अंतरवाली घटनेचा तीव्र निषेध या घोषणाही देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही घोषणा देऊ नये असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन प्रेयसीच्या मुलाचा अनन्वित छळ; विकृत प्रियकराला पोलीस कोठडी

वाहनाचा वेग नियंत्रणात असावा, इतर समाज बांधवांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहे. दिवसभराचे पाणी, जेवणाचा डबा सोबत ठेवावा, मोर्चा मार्गावर केरकचरा, पाणी बॉटल, खाध्य पदार्थांचे पॉकेट राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा – जरांगे कुटुंबीय जालन्याहून बुलढाण्याकडे रवाना, मराठा आरक्षण क्रांती मोर्च्यात होणार सहभागी

वाहनतळ व्यवस्था

अजिंठा, धाड रोडवरून येणाऱ्यांसाठी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती, मोताळा-मलकापूर मार्गाने येणाऱ्यांसाठी गुलाबचंद नगर तसेच चिखली मेहकरवरून येणाऱ्यांसाठी जिजामाता महाविद्यालय व शासकीय डीएड कॉलेजच्या प्रांगणात पार्किंग राहणार आहे. शहरातील लोकांसाठी कवीदीप हॉस्पिटलजवळ व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

Story img Loader