अमरावती : मराठा आरक्षण आंदोलन चिघळल्‍यामुळे अमरावती विभागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसगाड्या वाशीम आणि खामगावपर्यंतच चालवल्‍या जात असून खबरदारीचा उपाय म्‍हणून लांब आणि मध्‍यम पल्‍ल्‍याच्‍या एकूण २४ बस फेऱ्या बंद करण्‍यात आल्‍या आहेत.

अमरावती-पंढरपूर, अमरावती-लातूर, अमरावती-नांदेड, अमरावती-सोलापूर या बसगाड्या वाशीम पर्यंत तर अमरावती-बीड, अमरावती- छत्रपती संभाजीनगर, अमरावती-पुणे या बसगाड्या खामगाव पर्यंतच चालवल्‍या जात आहेत. एकूण सात प्रमुख मार्गांवरील एसटीची वाहतूक सध्‍या विस्‍कळीत झाली आहे. त्‍यामुळे मराठवाडा, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

हेही वाचा… मराठा आरक्षण आंदोलन पेटले असतानाच… परदेशी शिक्षणाची वाट खडतर! सरकारकडून झाली ही चूक

हेही वाचा… Video : मराठा बांधव जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच कारने घेतला पेट; काय झालं नेमकं…

एसटीच्‍या दरदिवसाला ६ हजार १७० किलोमीटर अंतराच्‍या फेऱ्या रद्द झाल्‍यामुळे अमरावती आगाराला दररोज ३ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच पंढरपूर आणि लातूर आगारात दोन बसगाड्या आंदोलनामुळे अडकून पडल्‍या आहेत. आंदोलन शमत नाही, तोपर्यंत त्‍या बसगाड्या तेथेच राहतील, अशी माहिती एसटीच्‍या विभागीय नियंत्रक कार्यालयाद्वारे देण्‍यात आली आहे.

Story img Loader