नागपूर: मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागपूरहून मराठवाडा, पुणेच्या दिशेने निघालेल्या बसेस मधातच थांबवल्या जात आहेत अथवा रद्द होत आहेत. या मार्गावरील एसटीचे परिचालन सुरळीत करण्यासाठी मंगळवारी नागपुरहून पूणे, औरंगाबादच्या दिशेने पून्हा एसटी बसेस निघाल्या आहेत.
नागपुरहून मंगळवारी दुपारी १ वाजता पुणेच्या दिशेने एसटी बस निघाली, तर ५ वाजता दुसरी बस निघणार आहे. ५.४५ वाजता छत्रपती संभाजी नगर, ६.३० वाजता अंबेजोगाईसह इतरही बसेसला चाचपणी म्हणून या मार्गावर महामंडळाकडून सोडले जाणार आहे. या बसेसच्या चालकांना प्रवाश्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कुठेही काही अनुचित आढळल्यास प्रसंगावधानुसार निर्णय घेण्याच्या सूचना आहे. तशी माहिती तातडीने वरिष्ठांना कळवावी लागणार आहे.
हेही वाचा – आपल्या देशाला ‘भारत’ नाव कशावरून पडले, त्याचे ‘इंडिया’ कसे झाले? वाचा
दरम्यान मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून एसटीच्या नागपूर विभागाचे रोज सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटरचे परिचालन रद्द होत आहे. त्यामुळे पुणे, मराठवाड्याच्या भागात निघालेल्या बसेसच्या फेऱ्या मधातच रद्द करणे वा फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर येत आहे. त्यामुळे एसटीला लक्षावधींचा फटका बसत आहे.