वर्धा: मराठी श्रावण महिन्यास आता आरंभ झालाय.महिलांचा हा आवडता महिना.श्रावणमासी हर्ष मानसी, श्रावणात घननिळा बरसला अशी व असंख्य गाणी कायमची मनात रुंजी घालतात.पावसाळ्यात येणारा श्रावण मास अनेक सणांना घेवून येतो.क्षणात उन क्षणात पावूस असे वेड लावणारे वातावरण असणारा श्रावण व्रतवैकल्यांनी परिपूर्ण असतो.सात्विक मनाचे प्रतिबिंब असणाऱ्या श्रावणात महादेवाचे सर्वाधिक महत्व.त्याला प्रसन्न करण्याची जणू चढाओढ असते.प्रत्येक श्रावणी सोमवरला शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रदोष पर्वकाळ याच महिन्यात असतो.श्रावणात भगवान शंकर आपल्या सासरी येतात व तिथे त्यांचा अभिषेक होतो,अशी पौराणिक मान्यता आहे.याच महिन्यात समुद्र मंथन झाल्याचे पुराणात सांगितले असून मंथनातून निघालेले विष पिवून शंकराने सृष्टीची रक्षा केल्याचे म्हटल्या जाते.शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास फलप्राप्ती होते.भगवान विष्णू हे या महिन्यात योगनिद्रेत निघून जातात.अशावेळी सृष्टीचे पालकत्व शिव शंकराकडे येते.म्हणून श्रावणात शिवपूजा अग्रभागी असते.पार्वतीने भगवान शंकरास प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर व्रते केली होती.उपवास साधना करीत शंकराला प्रसन्न करून घेतले होते.

हेही वाचा >>>‘बाईपण भारी देवा’साठी धावून आली मनसे, चित्रपटगृहावरील फलकावरून…

हेही वाचा >>>गोंदिया: अर्जुनी मोरगावचा आठवडी बाजार भरतो चिखलात

पार्वतीच्या कडक व्रतामुळे भगवान शंकराने प्रसन्न होत देवी पार्वतीशी विवाह केल्याचा पुराणात दाखला आहे.मकरंडू ऋषीने पुत्राच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात शिवशंकराची घोर तपस्या केली होती. असे विविध संदर्भ पुराणात आले आहे.म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे अधिक आहे.