बुलढाणा : मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यातील अनेक गावांत जाणवल्याचे वृत्त आहे. यामुळे हजारो गावकरी भयभीत झाले. मात्र, भूकंप दूरवरच्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाल्यावर स्थानिक प्रशासन आणि गावखेड्यातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी मराठवाडा सीमेला लागून असलेल्या गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या चर्चेला पुष्टी दिली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज, बुधवारी सकाळी मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा भूकंपाने हादरला. कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तिथे ४.५ तीव्रतेचा धक्का बसला. राष्टीय भूकंप केंद्राने (नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी) याची पुष्टी केली. याचे हादरे परभणी, नांदेड, परभणी, छत्रपती  संभाजीनगर या जिल्हयांनाही बसले आहे. याचबरोबर मराठवाड्याला लागून असलेल्या मेहकर आणि लोणार तालुक्यातील अनेक गावांत मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के जाणवले.

हेही वाचा >>>पोलीस पाटलांंच्या भरतीचा गैरव्यवहार पोहोचला काेर्टात….कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत….

‘धक्का’दायक अनुभव आणि ‘स्टेटस’!

आज सकाळी सात वाजून पंधरा ते सोळा वाजेदरम्यान हे धक्के जानविल्याचे डोणगाव (तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा) आणि लोणार शहर परिसरातील ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमाशी अनौपचारिक संवाद साधतांना सांगितले. यातील लोणार येथील विनोद सुर्वे यांनी आपला ‘धक्कादायक’ अनुभव सांगितला. सुर्वे म्हणाले, की ते आज झोपले असता त्यांना सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास पाठ आणि संपूर्ण शरीरच हलल्याचे जाणवले. घरात काही मोठी जड  वस्तू आदळल्याने हादरा बसला असावा असे वाटले.मात्र यासंदर्भात बायकोला विचारले असता, तिनेही घराला हादरे बसल्याचे सांगितल्यावर यावर विश्वास बसला. ‘टीव्ही’ चालू केल्यावर मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाल्याचे बातम्या पाहून समजले. डोणगाव ( तालुका मेहकर) येथील युवकाने असाच ‘थरार’क अनुभव विशद केला. डोणगाव परिसरात धक्के जानवल्याचे त्यांनी सांगितले. मी आज सव्वा सात वाजताच्या आसपास मुलांना शाळेत सोडण्यासाठी झोपेतून उठलो. यावेळी मला जमीन आणि बिछाना हलल्यासारखे जाणवले.  पत्नीला विचारणा केली असता तिनेही याला पुष्टी दिली. मी माझ्या मोबाईलवर, भूकंपाचे धक्के जाणंवल्याचा अनुभवाचा ‘स्टेटस’ ठेवले. यानंतर मला काही मिनिटातच चाळीस एक फोन आले. फोनवर बोलनाऱ्या मित्र आणि नातेवाईकांनी सकाळी सव्वा सात वाजेच्या आसपास धक्के जानवल्याचे’ सांगितले.

हेही वाचा >>>प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

जिल्हा आपत्ती कक्षाची पुष्टी

यासंदर्भात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांना विचारणा केली. त्यांनी डोणगाव (तालुका मेहकर) आणि लोणार तालुक्यातील  गावांत भूकंपाचे धक्के बसल्याचे स्पष्ट केले. मात्र यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जायचे काम नसल्याचे सांगितले. अश्या परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

यापूर्वी संतनगरीला…

मागील मार्च महिन्याात जिल्ह्यातील शेगाव शहर परिसराला आणि अकोला जिल्ह्याला लागून असलेल्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. याचे कारण त्या सौम्य भूकंपाचा केंद्रबिंदू बाळापूर तालुक्यातील अंतरी हे गाव होते. तेंव्हा शेगावचे तहसीलदार दीपक बाजड यांनी पुष्टी केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada earthquake shocks many villages in taluka of buldhana district scm 61 amy
Show comments