बुलढाणा : मुस्लिम शाह फकीर समाज संघटना महाराष्ट्र च्या वतीने आज क्रांती दिनी एल्गार पुकारण्यात आला. आज ९ ऑगस्ट रोजी मोताळा बस स्थानक चौकात आक्रमक जेल भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलन समाज  बांधवांच्या ऐक्याचे शक्ती प्रदर्शन ठरले.  राज्यातील मुस्लीम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा, या महत्वपुर्ण मागणी बाबत संघटनेच्या वतीने जिल्हाव्यापी “रास्ता रोको” जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याची सुरवात आज ऑगस्ट क्रांती दिनी  मोताळा येथुन करण्यात आली. यावेळी मोताळा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना  निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह, महासचिव जाकीर शाह,  प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह, विदर्भ अध्यक्ष मुश्ताक शाह, युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष अकिल शाह, जिल्हा अध्यक्ष तहेसिन शाह, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सईद शाह, सरदार शाह, तुराब शाह, एजाज शाह, जाकीर शाह, लुकमान शाह, आलिम शाह, अली शाह, मासुम शाह, बाबा शाह, शौकत शाह, अय्युब शाह, यासीन शाह मन्सूर शाह, हाजी आवेज शाह यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोराखेडी पोलिसांनी अटक केली. बोराखेडी पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली  कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March of the muslim shah fakir community on revolution days scm 61 ysh
Show comments