लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: पोंभूर्णा, भद्रावती व गोंडपीपरी बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे या भाजप व काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना पराभवाचा जबर धक्का बसला आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पोंभूर्णा बाजार समितीत काँग्रेसचे १२ संचालक निवडून आले तर भाजपचे सहा संचालक विजयी झाले. आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या गोंडपिपरी बाजार समितीत भाजप १२ तर काँग्रेसचे केवळ सहा संचालक विजयी झाले. येथे भाजपचे अमर बोडलावार यांनी परिश्रम घेऊन भाजपला यश मिळवून दिले. भद्रावती काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांचे वास्तव्य आहे. धानोरकर कुटुंबाचे भद्रावती मूळ गाव असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक व उद्बव ठाकरे शिवसेनेचे रवींद्र शिंदे यांनी स्वतःचे बळावर ११ संचालक निवडून आणले. तर काँग्रेसचे केवळ सहा संचालक विजयी झाले. येथे एक अपक्ष अविरोध निवडून आला.

आणखी वाचा- हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीत राष्ट्रवादीचं वर्चस्व; सुधीर कोठारी यांचे नेतृत्व पुन्हा प्रस्थापित

भद्रावती हा धानोरकर कुटुंबासाठी पराभवाचा जबर धक्का आहे. या तिन्ही बाजार समितीत प्रस्थापित नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. जिल्ह्यातील एकही बाजार समिती जिंकण्यात धानोरकर कुटुंबाला यश आले नाही. विशेष म्हणजे भद्रावती व वरोरा या स्वतःच्या मतदार संघात देखील धक्कादायक पराभव झाल्याने आगामी काळात धानोरकर यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.