प्रशांत देशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: राजकीय कुटुंबातील पुढील पिढीसाठी राजकीय पदार्पणाची संधी म्हणून बाजार समितीची निवडणूक आयतेच साधन ठरले आहे. थेट आमदारकी, खासदारकी किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुटुंबातील सदस्यास संधी देण्याची भूमिका सर्वच प्रमुख पक्षात दिसून येते. पण आता बाजार समितीपण अभिषेक करण्याची संधी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ज्येष्ठ सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र डॉ. संदीप देशमुख हे वर्धा बाजार समितीत एक उमेदवार असून त्यांच्याकडे संभाव्य अध्यक्ष म्हणून पाहिले जाते. सूतगिरणीचे अध्यक्ष असलेले डॉ. संदीप हे एक सुस्वभावी व लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांना ग्रामीण मतदार स्वीकारणार का, हा लाखमोलाचा प्रश्न ठरत आहे. दुसरे सहकार दिग्गज सुधीर कोठारी हे स्वतः व त्यांचे पुत्र डॉ. नीर्मेश कोठारी हिंगणघाट बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात आहेत. करोना काळात केलेल्या वैद्यकीय सेवेने ते चर्चेत होते. त्यांच्याकडेही संभाव्य अध्यक्ष म्हणून पाहिले जाते. वडिलांची यशस्वी परंपरा ते पुढे नेतात का, हे लक्षवेधी ठरणार.

हेही वाचा… “भेंडवळचे अंदाज अशास्‍त्रीय आणि ‘बोगस’..!”; शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांची टीका

मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष राहलेले दिवं. दिलीप काळे यांचे पुत्र संदीप काळे व त्यांच्या मातोश्री शोभा दिलीप काळे रिंगणात आहेत. हीसुद्धा चुरशीची निवडणूक ठरत आहे. देवळी पुलगाव बाजार समितीचे धुरंधर म्हणून ओळख राहिलेले मनोहर खडसे यांचे पुत्र मनीष खडसे राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे पुत्र निवडणुकीत उभे असल्याने या पैलूने अजब युती-आघाड्यांनी या निवडणुका गाजत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market committee election will be a political opportunity for the next generation of a political family pmd 64 dvr
Show comments