वाशिम : पणन महासंचालनालयाने प्रथमच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर केली. राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये पहिल्या दहामध्ये विदर्भातील ८ बाजार समित्यांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकावर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट दुसऱ्या क्रमांकावर आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा तृतीय क्रमांकावर आहे. वार्षिक क्रमावारीच्या यादीत पहिल्या दहामध्ये विदर्भातील ८ बाजार समित्या आहेत हे विशेष.

स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची २०२१-२२ मधील कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक यांनी तालुक्याच्या समितींचे गुणांकन केले. त्यावरून पणन संचालक, पणन संचालनालय पुणे येथे अंतिम निवड यादी तयार करण्यात आले आहे. जागतिक बँक अर्थसाहाय्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. राज्यातील ३०५ बाजार समित्यांच्या क्रमवारीच्या यादीत पहिल्या टॉप दहामध्ये विदर्भातील बाजार समित्यांचा दबदबा दिसून आला.

हेही वाचा : गिधाडांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राला सुरक्षित ठिकाण घोषित करण्याची मागणी

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही बाजार समिती राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट दुसऱ्या, वाशीम जिल्ह्यातील कारंजा तिसऱ्या, वाशीम जिल्ह्यातील वाशीम व मंगरुळपीर आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार चौथ्या, नागपूर जिल्ह्यातील काटोल पाचव्या, अकोला सहाव्या,उमरेड सातव्या अशा पहिल्या दहामध्ये विदर्भातील ८ बाजार समित्या आहेत. जागतिक बँकेने सुचवलेल्यानुसार बाजार समित्यांचे गुणांकन करून राज्यातील बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.प्रकल्पांतर्गत अमरावती विभागातील ५५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर पणन संचालनालयाने क्रमवारी जाहीर केली. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समितीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समिती आहे.

Story img Loader