नागपूर : मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत, अशा लोकांनी नवीन शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. दिवाळी आली की वधू-वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागतात. तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक मासामुळे दिवाळी लांबल्याने यंदा लग्न मुहूर्तही लांबले. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून अनेक मुहूर्त असून विवाह हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. पंचाग अभ्यासक भूपेश गाडवे यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ६६ मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आठ मुहूर्त अधिक आहेत. यात ४४ गोरज मुहूर्ताचा योग आहे. मात्र वैशाखात लग्न करू इच्छिणाऱ्यांचा यंदा या महिन्यात एकही मुहूर्त नसल्याने हिरमोड झाला आहे. नोव्हेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात २७, २८, २९ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये ६, ८, १५, १७, २०, २१, २५, २६ आणि ३१, तर जानेवारी २०२४ मध्ये २, ६, ८, १७, २२, २७, २९, ३० आणि ३१ या तारखांना विवाहाची संधी आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : मुस्लीम बांधवांच्या ‘या’ निर्णयाचे कौतुक, गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद…

वैशाखात जास्त शुभ मुहूर्त असतात. त्यामुळे कडक उन्हात लग्नांची धूम असते. मात्र, यावर्षी ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे ५६ दिवस मंगल कार्यालये, तसेच लग्नकार्याशी संबंधित व्यावसायिकांना घरी बसून राहण्याची वेळ येणार आहे.

नोव्हेंबर ते जुलै ६६ मुहूर्त

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त आहे. मागील वर्षापेक्षा यंदा आठ मुहूर्त अधिक असून वधू-वराकडील मंडळींची लगबग सुरू झाली असून मंगल कार्यालयांचे बुकिंग सुरू झाले आहे.

हेही वाचा – आरक्षणाचा तिढा : ‘‘ओबीसीमधून कुणालाच आरक्षण देऊ नये, मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण द्या”, ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाची भूमिका

गोरज मुहूर्तावर ‘या’ तारखा

काही लोकांना गोरज मुहूर्तावर लग्न करण्याची इच्छा असते. अशांसाठी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ मध्ये एकूण ४४ गोरज मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवाळीनंतर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage dates from november 2023 to july 2024 dag 87 ssb
Show comments