अकोला : शहरात एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २६ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी आरोपी रणजीत मावळे (३४) याचे एका विवाहितेसोबत प्रेम प्रकरण सुरू होते.
हेही वाचा >>> ग्रामपंचायतमध्ये सरपंच व नागरिकात ‘फ्रीस्टाइल’; वादाचे पर्यवसान हाणामारीत
रणजीत हा सुद्धा विवाहित असून, तो विवाहितेला ब्लॅकमेल करीत होता. विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण विवाहितेच्या पतीला लागली. त्यामुळे त्यांचे बिंग फुटले. या प्रकरणी विवाहितेने खदान पोलीस ठाण्यात रणजीत मावळे याच्याविरुद्ध तक्रार दिली. खदान पोलिसांनी आरोपी रणजीत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, २ (एन) ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खदान पोलीस करीत आहेत.