लोकसत्ता टीम
चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील तेलंगाना सीमेजवळील एका गावातील विवाहित महिलेवर नवऱ्याच्या नातेसंबंधातील चुलत मामे भावाकडून तिच्याशी जबरदस्ती करत बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार कोरपना पोलीसात बुधवारी दाखल करण्यात आली.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नवऱ्याचा चुलत मामे भाऊ याने पिडीतेला एका महिन्यापासून छेडछाडी करून तिला बदनामीची धमकी देत होता. २० एप्रिलला पिडीत विवाहित महिला घरात एकटी असताना त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा दोनदा धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १० मे ला हात धरून बकऱ्या चरायला चल म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याला कंटाळून पीडित महिलेने कोरपना पोलीस स्टेशन गाठून बुधवारी तक्रार दाखल केली. या प्रकरणी शुभम तलांडे (२२) याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा… कौतुकास्पद! आधी श्रमदान, नंतर लग्न; मीनाक्षीने मेहंदी लावलेल्या हातांनी…
या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम ३७६ (२) (एन), ३५४, ४१७, ५०६ भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संजय शुक्ला व कोरपना पोलीस करीत आहे.