नागपूर : कर्जाची परतफेड करण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नकळत अश्लील छायाचित्र काढले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिचे शोषण करू लागला. महिलेने विरोध केला असता आरोपी तरुणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. पीडितेने घटनेची तक्रार हुडकेश्वर पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. अभिषेक मुन्नालाल गुप्ता (३२) रा. विज्ञाननगर असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

पीडित ३९ वर्षीय महिला आणि तिच्या पतीचे किराणा दुकान आहे. अभिषेक खासगी कंपनीत सेल्समनचे काम करतो. त्यामुळे त्याचे महिलेच्या दुकानात येणे-जाणे होते. या दरम्यान अभिषेकने महिलेला विश्वास दिला की, तो तिच्यावर असलेले बँकेचे सर्व कर्ज फेडून देईल. महिला त्याच्या जाळ्यात अडकली. अभिषेकने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिच्या न कळत छायाचित्रही काढले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितेचे शोषण करू लागला.

devendra fadnavis vote jihad
“धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका
naresh Puglia bjp Sudhir mungantiwar
चंद्रपूर : काँग्रेस नेते नरेश पुगलिया व भाजप…
Congress Secretary Sandesh Singalkar filed a complaint against Modi, Shah, and Nadda with Election Commission
संविधान बदल अन् ‘ चारसो पार’ चा नारा:मोदी, शाहांविरुद्ध एफआयआर करा,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
gadchiroli bhamragarh Naxalite bomb blast
अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Bachchu Kadus wife naina kadu is also in field against Ravi Rana
रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात
mutton chops diwali meeting
चंद्रपूर: स्नेहमिलन दिवाळीचे, जेवणात मटनचॉप्स…निवडणुकीने सणाची व्याख्याच…
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
yavatmal political parties campaigning
यवतमाळ: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….

हेही वाचा: नागपूर: धवनकरांच्या चौकशीनंतर आरोपपत्र!; कुलगुरूंनी खंडणी प्रकरणात मागितले स्पष्टीकरण

पीडितेच्या पतीलाही याबाबत माहिती होते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागले. बुधवारी सायंकाळी अभिषेक महिलेच्या घरी आला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अभिषेकने चाकू काढून महिलेच्या गळ्यावर वार केला, मात्र महिलेने तो चुकवला. त्यानंतर अभिषेकने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोख १५०० रुपये हिसकावले आणि फरार झाला. पीडितेने घटनेची तक्रार पोलिसात केली. हुडकेश्वर पोलिसांनी अभिषेक विरुद्ध खुनाचा प्रयत्न, लूटमार, लैंगिक अत्याचार आणि विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.