अकोला : सूर्यमालेत सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रह आणि पृथ्वी नंतरचा मंगळ ग्रह २७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. या अनोख्या दृष्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.

चंद्र आकाशात दररोज १२ अंश पुढे सरकत असल्याने दर महिन्याला प्रत्येक ग्रहाची आणि चंद्राची युती घडून येते. त्यामुळे आकाशात ग्रहाची ओळख सहज होत असते. चंद्राप्रमाणेच ग्रहसुद्धा ठराविक कालावधीत एकमेकांच्या जवळ येतात. बुध ग्रह सूर्याच्या जवळ आणि अंतर्ग्रह असल्याने केवळ सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर फार कमी वेळ या ग्रहाचे दर्शन घडते. दुर्बिणीतून या ग्रहाच्या चंद्राप्रमाणे विविध कला पाहता येतात. सध्या एकादशीच्या कलेप्रमाणे दिसेल. आकाशात लालसर रंगाचा मंगळ ग्रह लवकर लक्षात येत असल्याने त्याच आधारे बुध ग्रहाचे दर्शन अधिक सुलभ होईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा

हेही वाचा – कुलगुरू पदावर पुन्हा एकदा संघभूमीचा डंका, राज्यात नागपूरचे किती कुलगुरू आहेत बघा

हेही वाचा – प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् प्रियकरानेही गळा कापून घेतला, अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

हे दोन्ही ग्रह सध्या धनु राशीत २२ व्या अंशावर आहेत. रात्री १० वाजता या दोन ग्रहांमधील अंतर सर्वात कमी असेल. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवावा. याच प्रकारे मंगळ ग्रह येत्या २२ फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रहाजवळ असेल, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

Story img Loader