अकोला: विदर्भात कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात नऊ जण शहीद झाले होते. त्यानंतर ५४ वर्षांपूर्वी अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच होण्यासाठी प्रचंड मोठे आंदोलन १९६८ साली उभारण्यात आले होते. यादरम्यान आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान व्यर्थ गेले नाही.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत

हेही वाचा… नोकरीसाठी क्युआर कोडद्वारे पैशाची मागणी; महामेट्रोने केला खुलासा

विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली. विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभा घेण्यात आली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता तथा कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे आदींसह वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा… वरुणराजा रुसले! यंदाचा ऑगस्ट इतिहासातील सर्वात ‘कोरडा’ महिना ठरणार?

शहीद स्मारकाला वंदन करीत शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. पोलीस विभागाने बिगुल वाजवून व सामूहिक मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी उपस्थित सर्वांनाच सद्भावना शपथ दिली. संचालन डॉ. सचिन शिंदे यांनी केले. यानंतर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Story img Loader