भंडारा : वर्षभरापूर्वी फेसबुकवर फ्रेंड्सशिप झाली आणि त्यातूनच अल्पवयीन मुला-मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले, प्रेमात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. मुलीला खासगी रुग्णालयात आणल्यावर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले.  दोन्ही अल्पवयीन असल्याने साकोली पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयीन आदेशाने बाल सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

साकोली तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील १७ वर्षांचा मुलगा आणि १६ वर्षांची एक मुलगी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकतात. वर्षभरापूर्वी फेसबुकवर दोघांनीही एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर प्रोफाइल पिक्चर बघून दोघांत जिवापाड प्रेम पडले. एकमेकांना मेसेज, व्हॉट्सअॅप चॅटिंग सुरू झाले. हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि ते दोघे शरीरानेही जवळ आले. दोघेही शारीरिक संबंध ठेवू लागले, असे काही महिने चालत राहिले.

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
khushi kapoor boyfriend vedang raina name spotted on her bracelet
खुशी कपूरने स्वत: दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेला ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हेही वाचा >>> नागपूर : “ऑनलाईन माध्यमातून ओळख झाली आणि…”; बारावीच्या विद्यार्थिनीवर ओढावला धक्कादायक प्रसंग

 बुधवारी २६ जुलै रोजी मुलीला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला. बेशिस्त पीडितेच्या परिवाराने गुरूवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर साकोली पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शाळेत आपल्या पाल्यांना स्मार्टफोन न देण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी केले आहे.