नागपूर : छत्तीसगड येथील बालोद येथे भाचीच्या लग्नात मामा बेभान होऊन नाचत होता. नाचतानाच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

छत्तीसगड येथील भिलाई स्टील प्लांटच्या बालोद येथील दल्ली राजरा खाणीत दिलीप राऊतकर हे अभियंता म्हणून कार्यरत आहे. ४ मे रोजी त्यांच्या भाचीचे लग्न दल्ली राजरा येथे संपन्न झाले. या लग्नाचे सेलिब्रेशन रात्री १२ वाजतापर्यंत सुरू होते. सेलिब्रेशनदरम्यान वर-वधू दोघेही स्टेजवर नाचत होते. दोघांना नाचताना बघत उत्साहात दिलीप राऊतकरही नाचायला स्टेजवर गेले. तेही आनंदाच्या भरात बेभान होऊन नाचू लागले.

dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण
Bollywood actor salman khan Dance On Kombadi Palali Song sung by Vaishali made old video viral softnews
Video: ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर सलमान खानचा जबरदस्त डान्स पाहिलात का? वैशाली माडेला लावलं होतं गायला, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
boyfriend died by heart attack
“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!
College youth drowned Khamboli lake, Khamboli lake, Mulshi,
मुळशीतील खांबोली तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
Young girl’s dance to Stree 2 song goes viral earns praise from Shraddha Kapoor
स्त्री २च्या “काटी रात मैने..” गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून श्रद्धा कपूरनेही केले कौतुक
boy died after injured in leopard attack, leopard attack in Mandavgan Farata,
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप
व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – नागपूरमार्गे धावणाऱ्या सात रेल्वेगाड्यांना विलंब

नाचताना अचानक त्यांच्या हृदयात वेदना सुरू झाल्या. त्यामुळे ते खाली बसले. त्यानंतर काही सेकंदातच ते स्टेजवर झोपले. अचानक दिलीपला झोपलेले पाहून सर्व वऱ्हाडी तेथे धावले. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.