नागपूर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना (ठाकरे गट) लढवणार असून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागपूरची शिवसेनेला सुटलेली जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे. पण काँग्रेसने अद्याप आपला पाठिंबा कोणत्याच उमेदवाराला जाहीर न  केल्याने पाठिंब्याबाबत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे की विमाशीचे सुधाकर आडबाले असा तिढा कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर प्रश्न निर्माण झाला. विशेषत: काँग्रेस येथे बेअब्रू झाली. परंतु काँग्रेसने अपक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली. तर नाशिकची जागा शिवसेना (ठाकरे गट) लढवण्याचे ठरवले. तेथे त्यांनी पक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली.

हेही वाचा >>> गडकरींना धमकी देणाऱ्या कैद्याला मोबाईल-इंटरनेट सुविधा, असा शोधला गडकरींच्या कार्यालयाचा दूरध्वनी

ही जागा महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार शिवसेना (ठाकरे गट) कडे गेली होती. परंतु काँग्रेसचे स्थानिक नेते या जागेसाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट देखील घेतली होती. पदवीधर मतदारसंघात शिक्षक भारतीने मदत होती तेव्हा शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने शिक्षक भारतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केली. आता तांबे-पुत्राच्या पवित्र्यामुळे आपसूकच ही जागा काँग्रेसकडे आली.

हेही वाचा >>> नागपूर : अपघातांची मालिका, सुविधांचा अभाव, तरीही ‘समृध्दी’ सुसाटच, महिन्यात २१ कोटींची…

मुंबईतील आजची नियोजित बैठक होऊ शकल्याने काँग्रेसचा शिक्षक मतदासंघातील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. महाविकास आघाडी म्हणून नाशिक आणि नागपूरच्या उमेदवारीची घोषणा होणे अपेक्षित आहे. नाशिकची जागा मिळाल्याने शिवसेनेचे नागपुरातील उमेदवार नाकाडे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील. परंतु काँग्रेसचा पाठिंबा राजेंद्र झाडे की सुधाकर आडबाले यापैकी कोणाला मिळतो. हे बघणे उत्सूक्याचे आहे.सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maviya seats in legislative council elections exchange to whom congress support in nagpur rbt 74 ysh