नागपूर : राज्यात वाहनचोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक वाहने मुंबई आणि पुणे शहरातून चोरी गेली आहेत. वाहनचोरीत नागपूर शहराचा तिसरा क्रमांक असून चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यात नागपूर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. ही आकडेवारी पोलिसांच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून चोरट्यांनी वाहनचोरीचा धडाका सुरू केला आहे. मोठमोठ्या शहरातून वाहन चोरी करून थेट अन्य राज्यात विक्री करीत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. काही प्रकरणात ग्राहकांच्या मागणीनुसार वाहन चोरी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. वाहन चोरीच्या घटना वाढल्यामुळे राज्यातील प्रत्येक आयुक्तालयात वाहनचोरी प्रतिबंध-शोध पथकांची स्थापना करण्यात आली. मात्र, हे पथक पांढरा हत्ती ठरत असून पथकातील कर्मचारी फक्त वसुली करण्यासाठी वाहनाचा वापर करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Nagpur Darjeeling girls, Darjeeling girls prostitution Nagpur,
नागपूर : देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये आणल्या दार्जिलिंगच्या तरुणी
Nagpur, food vendors Nagpur, Traffic congestion Nagpur, food vendors encroachment Nagpur,
नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
Nagpur Police starts vasuli from sellers
नागपूर पोलिसांकडून वसुलीचा ‘नाईट पॅटर्न’…. रस्त्यावरचे दिवे मालवून…
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…
From BJP Devendra Fadnavis has been nominated for sixth time and Chandrashekhar Bawankule for fourth time
नागपूर : फडणवीस सहाव्यांदा; बावनकुळे, खोपडे चौथ्यांदा अन्…

हेही वाचा – नवऱ्याला व्हॉट्सॲपचा डीपी बदलवण्यास सांगून ‘ती’ धावत्या मालगाडीसमोर बसली; योग शिक्षिकेची आत्महत्या

वाहन चोरी विरोधी पथक स्थापन केल्यामुळे वाहनचोरांवर अंकुश ठेवता येईल, हा पोलिसांचा दावा सपशेल खोटा ठरत आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत गेल्या पाच महिन्यांत ८१९ वाहने चोरी झाली असून २६३ वाहनांचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक २३८ तर मार्च महिन्यात १८३ वाहने चोरी केली आहेत. पुण्यात ६९० वाहन चोरीच्या घटना घडल्या असून १५९ वाहनांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक (१७८) तर जानेवारी महिन्यात (१७६) वाहनांची चोरी झाल्याची नोंद आहे.

नागपुरात गेल्या पाच महिन्यांत ५१३ वाहन चोरीच्या घटना घडल्या असून केवळ ९७ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातही पोलीस ठाण्यातील तपास पथकाने ८० टक्के वाहने शोधली आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक (१३८) व एप्रिल महिन्यात (१३७) वाहने चोरी झाली आहेत. वाहन चोरी करणाऱ्या टोळ्या शोधण्यासाठी पथके योग्य ती सतर्कता दाखवत नसल्यामुळे वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – अकोला : गडकरींनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

अल्पवयीन आरोपींची संख्या मोठी

वाहनांची चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येतो. बुलेट, पल्सर यासारख्या महागड्या दुचाकींची चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांना गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून प्रशिक्षण दिले जाते. पाळत ठेवून किंवी रात्रीची टेहळणी करून चारचाकी किंवा दुचाकी वाहनाची चोरी केली जाते. चोरीची वाहने ‘नम्बर प्लेट’ बदलून अन्य राज्यात विक्री केली जातात.

राज्यातील वाहनचोरी आकड्यात

शहर, वाहनांची चोरी, सापडलेली वाहने

मुंबई – ८१९, २६३

पुणे – ६९०, १५९

नागपूर – ५१३, ९७