वर्धा : पाळल्या जात नसला तरी लग्नासाठी मुहूर्त पाहूनच बँड वाजतो. मार्च व एप्रिल महिन्यात लग्नासाठी मोजकेच मुहूर्त होते. त्यामुळे वर-वधू पित्यांनी मे व जून महिन्यावर भिस्त ठेवली होती. आता असे अनेक असल्याने बँड, मंगलकार्यालय, कॅटरिंग व अन्य व्यावसायिकांची चंगळ आहे.
सोयी नसणाऱ्याही कार्यालयांचे भाव वधारले आहे. मे महिन्यात दोन, तीन, चार, सात, नऊ, दहा, अकरा, बारा, पंधरा, सोळा, एकवीस, बावीस, एकोणतीस व तीस अशा मुहूर्तांच्या तारखा आहेत, तर जूनमध्ये एक, तीन, सात आठ, अकरा, बारा, तेरा, चौदा, तेवीस, सत्तावीस व अठ्ठावीस या तारखा असल्याचे दामोधर शास्त्री सांगतात.
हेही वाचा – यवतमाळ: बसस्थानक की चोरट्यांचा अड्डा?; नवरीचे तीन लाखांचे दागिने लंपास
गेल्या दीड महिन्यात गुरूचा अस्तकाळ राहल्याने मुहूर्त नव्हते. त्यावेळी मात्र साक्षगंध आटोपण्यात आले. आता मुहूर्त पाहून काहींनी वेगवेगळे बुकिंग केले. मात्र काहींना ते शक्य न झाल्याने जूनवर भिस्त ठेवून वधू पिते कामास लागले. त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडत आहे. काही कार्यालयात दोन लग्न करण्याची व्यवस्था होत आहे. हाती काहीच न लागलेले शाळा, महाविद्यालय शोधू लागले आहेत. बँडवाल्यांचा भाव तासागानिक वाढत आहे. कॅटरिंग व्यवसायाची तर चांदीच म्हणावी. पण सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ असणाऱ्या मुलगा किंवा मुलीचे यंदा उरकायचेच, असा निश्चय असणारे पालक मात्र धावपळीत असल्याचे चित्र आहे.