लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ: जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला. यवतमाळातील अमित यादव टोळीविरुद्घ मकोका कारवाईस मंजुरी मिळाली आहे. हातभट्टी गाळप करणार्या दोन गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यातंर्गत एक वर्षासाठी स्थानबद्घ करण्यात आले.
विजय दामोदर टोळे (४७, रा. गुरुदेवनगर) याला अमित यादव व गौरव उमाटे हे दुचाकीवर बसवून नेत असल्याची घटना दहा मे रोजी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. दोघांनी आदित्य पाली, दीपक पुराम यांच्या मदतीने विजयला लुटपाट करण्याच्या उद्देशाने मारहाण केली व पाण्यात बुडवून खून केला, अशी कबुली दिली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात अमित राजकुमार यादव (३३, रा. देवीनगर), गौरव भारत उमाटे (२८, रा. लोहारा), आदित्य मनोज पाली (२०, रा. लोहारा), दीपक उत्तम पुराम (२४, रा. देवीनगर), अंकुश विलास रामटेके (२१), फुलचंद सुधाकर कासार (२१, रा. देवीनगर) यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सहा आरोपींचा सहभाग व ते रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कलम वाढीची परवानगी मिळण्यासाठी एसडीपीओ यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्याला आज सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्यात आता मकोका कायद्याचे कलम समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच अवैधरीत्या गावठी हातभट्टी दारू विक्री करणारा यवतमाळ शहरातील किशोर शंकर कटरे (५५, रा. पिंपळगाव) व बाभूळगाव हद्दीतील संजय किसन काथोटे (४३, रा. दाभा) यांच्याविरुद्घ स्थानबद्घतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकार्यांनी मान्यता देत स्थानबद्घतेचा आदेश पारीत केला. दोघांना एक वर्षासाठी यवतमाळ कारागृहात स्थानबद्घ करण्यात आले.
आणखी वाचा-खुल्या बाजारातून वीज खरेदीतून प्रतियुनिट १ रुपयांची बचत!
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ संजय पुज्जलवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, अवधूतवाडी ठाणेदार ज्ञानेश्वर देवकते, पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत, पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, सपोनि संजय राठोड, पीएसआय रावसाहेब बुधवंत, पीएसआय धनराज हाके, राजेश तिवारी, बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघाट, रवी नेवारे आदींनी केली.
पुसद येथील गुन्हेगारी टोळी तडीपार
पुसद शहरातील तुंडलायत कुटुंबीयाच्या टोळभने दहशत रहावी म्हणून गुन्हे करण्याचा अभिलेख आहे. या टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी आज सोमवारी तडीपारीचा आदेश पारीत केला.
आणखी वाचा-नागपुरात डेंग्यू वाढतोय! किती रुग्ण आढळले पहा…
नितीन सुरेश तुंडलायत (३७, रा. महावीरनगर, पुसद), अमर अशोक तुंडलायत (४०), राजेश अशोक तुंडलायत (३७), उमेश अशोक तुंडलायत (२२), सर्व रा. नवलबाबा वार्ड, पुसद, अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तुंडलायत टोळीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर टोळीला महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ कलम ५५(१) अन्वये तडीपार करण्याचा प्रस्ताव पुसद शहर पोलीस निरीक्षकांनी पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी तुंडलायत टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव पारीत केला. आदेश प्राप्त होताच तामील करीत चारही जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.