अमरावती : अमरावतीत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३०० ग्रॅम मेफिड्रोन (एमडी) घेऊन शहरात येणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एमडी, मोबाइलसह एकूण १२ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी मुंबईतील पुरवठादारालाही बेड्या ठोकल्या आहेत.

खलिदोद्दीन झामोरीद्दीन (रा. माना, ता. मूर्तिजापूर), अश्फाक अशरफ शेख (नौपाडा, बांद्रा, मुंबई) आणि शोएब अहमद शेख हसन (रा. चांदणी चौक, अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खलिदोद्दीन झामोरीद्दीन व अन्य दोघे अमरावती ते नांदगाव पेठ मार्गावरील हॉटेल मेजवानीजवळ ‘एमडी’ या अमली पदार्थाच्‍या विक्रीबाबत व्यवहार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याआधारे पोलिसांनी तिघांवर कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ हस्‍तगत करण्‍याची शहर पोलिसांची ही अलीकडच्‍या काळातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

हेही वाचा – ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच देवस्थान लुटले ! घाटंजीतील उंबरझरा संस्थानात विश्वतांकडूनच ४३ लाखांचा अपहार

हेही वाचा – खळबळजनक! देशात जानेवारी व फेब्रुवारीत एकूण ३४ वाघांचा मृत्यू

पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरामध्‍ये होणाऱ्या एमडी विक्रीच्‍या अनुषंगाने पुरवठादारांवर कारवाई करण्‍याचे निर्देश दिले होते. याबाबत त्‍यांनी गुन्‍हे शाखेला मार्गदर्शनदेखील केले होते. एमडी शहरात कुठून येते, त्‍याचा पुरवठादार कोण, स्‍थानिक वितरक कोण, याची माहिती काढण्‍यासाठी सायबर विभागाची मदत घेण्‍यात आली. ठोस माहिती हाती लागताच सापळा रचण्‍यात आला.

Story img Loader