चंद्रपूर : नागपूरहून खासगी कारने मॅफेड्रान (एम.डी) या अंमली पदार्थांची तस्करी करतांना स्थानिक गुन्हे शाखेने दोन अट्टल गुन्हेगारांना पडोली चौकातून अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ८० हजार रूपयांचे अमली पदार्थ, एक तलवार, वाहन असा एकूण २८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहरूख मतलुब खान (२८), साहील ईजराइल शेख (२८) रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर, असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मंडळ अधिकारी व पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपींना १० वर्षांची शिक्षा

दोन इसम खासगी कारने नागपुर वरून एम डी. ड्रग्ज विकीकरीता चंद्रपूरातील पडोली चौक येथे येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली चौकात सापळा रचून एक संशयास्पद वाहन दिसून आले. वाहन थांबवून चौकशी केली असता, शाहरूख मतलुब खान रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढऱ्या भुरकट रंगाचे एम.डी (मॅफेड्रान) पावडर आढळून आले. त्यांचे वजन १९८ ग्रॅम असून अंदाजित किंमत १९ लाख १८ हजार रूपये आहे. कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार आढळून आली. आरोपी शाहरूख मतलुब खान, साहील ईजराइल शेख रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर या दोघांनाही अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे.

हेही वाचा >>> राजू बिरहाची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द, काय होते प्रकरण? वाचा…

ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे यांच्या पथकाने केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Md drugs worth rs 19 lakh 80 thousand seized in nagpur rsj 74 zws
Show comments