बुलढाणा : जळगाव जिल्ह्यातील जामनेर ते बुलढाणा (एमएच ४० एन ९९४७ ) ही बस आज दुपारी बुलढाण्यात सुखरूप पोहोचली. जयस्तंभ, संगम चौक पार करून आता बुलढाणा बस आगारात शिरणार तोच बस प्रवेशद्वारातच अडकली. गाडी गरम झाल्याने मध्येच अडकल्याचे वाहक व चालकाने सांगितले.
आगारात जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वार ते अजिंठा मार्गावर बस आडवी थांबल्याने वाहतूक खोळंबली. एवढेच काय, इतर गावावरून येणाऱ्या बससुद्धा या दाराने आत जाणे अशक्य ठरले. यामुळे इतर बस बाहेर जाण्याच्या मार्गाने आत जाऊ लागल्या. यामुळे मार्गावर ‘ट्रॅफिक जाम’ झाली. चालक, वाहकाने बाजूच्या हॉटेल मधून बादलीने पाणी आणून इंजिन वर पाण्याचा मारा केला, पण ती काही थंड व्हायला तयारच होईना.
हेही वाचा… नागपूर: अन् चक्क पांढरे घुबड झाले कॅमेरात कैद
हेही वाचा… शहरांमध्ये वन्यप्राण्यांचा उच्छाद; भर वस्तीत रानडुकराचा महिलेसह दुचाकीस्वारावर हल्ला
अखेर कार्यशाळेतून आलेल्या तंत्रज्ञाने खूप वेळ खटाटोप केल्यावर कुठे लालपरी हलली आणि तासापासूनची खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. परंतु, पोलीस वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी इकडे फिरकला नाही, हे विशेष