वर्धा : माध्यमं आणि संघाची अतूट मैत्री असल्याने संघात काय चाललंय याचे माध्यमांना औत्सुक्य असते, असे राष्ट्रीय सेवन संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारप्रमुख प्रमोद बापट म्हणाले. संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमानिमित्त ते वर्धेत आले होते. संघाच्या गुजरात, गोवा व महाराष्ट्र प्रदेशाचे प्रचारप्रमुख असलेल्या बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेही जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत व नगरचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

बापट पुढे म्हणाले की, माध्यमांना विविध विषयांत रस असतो. मात्र त्यांनी संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन अराजकीय ठेवावा. दोन वर्षांनंतर संघाची शताब्दी होणार आहे. संघाची स्थापना झाली नाही. मात्र कार्य सुरू झाले. देश पारतंत्र्यात होता तेव्हा देशाच्या सामाजिक स्थितीवर चिंतन झाले आणि डॉ. हेडगेवार यांनी आजपासून संघाचे काम सुरू होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शताब्दीचे कार्यक्रम काय, असा प्रश्न पत्रकारांनाही पडू शकतो. आज देशात तालुकास्तरावर संघाचे काम पोहोचले आहे. प्रशिक्षणाची संख्याही वाढत आहे. तृतीय वर्षाचे एका ठिकाणी शिबीर होते. द्वितीय वर्षाचे १२ ते १४ ठिकाणी तर प्रथम वर्षाचे ७० वर्ग होतात. प्राथमिकचे शेकडो वर्ग होत असून प्रथम आणि प्राथमिकमध्ये १ लाख ४० हजार स्वयंसेवक सहभागी झालेत. जगात ४३ देशांत संघाचे कार्य सुरू आहे, असे बापट म्हणाले.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Crime NEws
Crime News : घरात चिकन बनवण्याचा आग्रह, आई आणि भावांनी गळाच आवळला; पोलिसांना कसा लागला खुनाचा छडा?
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?

हेही वाचा – चंद्रपुर : वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा! फडणवीस यांचे मराठा आंदोलकांना आवाहनच  जरांगे यांचे शिंदे यांना निमंत्रण

भारतातून शिक्षण, व्यवसायनिमित्त विदेशात गेलेल्यांनी संघ प्रेरणेतून काम सुरू केले. संघ शताब्दी म्हणून वेगळे काम करणार नाही. संघाच्या गतीविधीतून सामाजिक परिवर्तनाचे काम सुरू आहे. समाजात जावून संघ काम करतो. करोना काळात कुटुंबाची व्याप्ती वाढत गेली. सामाजिक समरसतेत दोष शिरले. एकसंघ असलेल्या समाजात भेद निर्माण झाले. समाज संघटित राहिला तर कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. परस्परांचा सन्मान व्हावा, विविधतेचा उत्सव व्हावा आणि गतीविधींचे काम वाढावे, असे बापट म्हणाले.