लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात काम करणारे अधिकारी-कर्मचारी तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबांसाठी सरकारतर्फे वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दरवर्षी नुतनीकरण करावे लागते. कामात व्यग्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा याची आठवण राहात नाही. सध्या सेवारत असणारे किंवा निवृत्त झालेल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत महत्वाची असणारी ही योजना असल्याने शासनाकडून वेळो वेळी याबाबत कर्मचाऱ्यांना अवगत गेले जाते. त्याचाच एक भाग म्हणून याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.

वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे ३० दिवसांत नुतनीकरण करणे आवश्यक असून या योजनेत नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांना ९० दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रभारी वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्फण करणारे अधिकारी-कर्मचारी तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंबांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या वर्ष २०२४-२५च्या नुतनीकरणास २५ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

आणखी वाचा-नागपुरात इतवारीत भीषण आग; तरूणी दगावली, दोघे जखमी

१ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच गतवर्षी समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांना या योजनेमध्ये स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता १८-३५ वर्ष, ३६-४५ वर्ष, ४६-५८ वर्ष व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्याचे दर ठरविण्यात आले आहेत. योजनेच्या नुतनीकरणासाठी संबंधीत विमाधारकास कंपनीद्वारे लिंक मोबाईलवर एसएमएस अथवा ई-मेलद्वारे प्राप्त होणार आहे. विमा हप्त्याचे प्रदान लिंकद्वारे प्रदान करणे बंधनकारक आहे. संबंधित विमा कंपनीला एनईएफटी/ आरटीजीएस/ युपीआय अथवा क्रेडीट कार्डद्वारे प्रदान करता येणार असून डेबिट कार्डद्वारे पेमेंट प्रदान करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये विमा धारकांना अडचण आल्यास द न्यू इंडिया ॲश्युरन्स कं. लि. यांचेशी ८६५२४३५९३४/ ०२२-२६५९००७० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच या योजनेबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, संकेतांक क्र.२०२४०७२३१०४१११९६०५ द्वारे उपलब्ध आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical reimbursement insurance scheme by govt for government employees retired pensioners and their families cwb 76 mrj